Advertisement

जळगावात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न!स्नेहदर्पण सेवा फाउंडेशन व स्वातंत्र्य सैनिक जनार्दन सुका खडके विद्यामंदिराचा स्तुत्य उपक्रम

जळगाव: विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि पालकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी जळगावात नुकतेच एक विशेष मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर उत्साहात पार पडले. स्वातंत्र्य सैनिक जनार्दन सुका खडके प्राथमिक विद्यामंदिर आणि स्नेहदर्पण सेवा फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील आयुर्वेदिक विभाग, दंत विभाग व होमिओपॅथिक विभाग यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय तपासणी, मार्गदर्शन व उपचार देण्यात आले. या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे, विद्यार्थ्यांसोबतच पालकांची देखील संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच शिबिरात उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांचे मोफत आभा (ABHA) कार्ड देखील काढून देण्यात आले, ज्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी मोठी जनजागृती दिसून आली.

प्रमुख उपस्थिती व सहकार्य:

या शिबिरास यशस्वी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले:

  • तज्ज्ञ डॉक्टर्स: डॉ. निखिल पाटील, डॉ. शितल सोगे, डॉ. मीनल महाजन, डॉ. राखी वाणी, स्नेहा निंभोरे,  डॉ. शीतल चव्हाण, डॉ. संदीप कुमार, डॉ. समृद्धी गंगवाल आणि डॉ. हर्षल बाफना.

  • वैद्यकीय कर्मचारी वर्ग: श्री. कल्पेश नेरे, श्री. चेतन तांबोळी, श्री. विशाल गवळी आणि श्री. गोविंद निमगुळे.

  • मान्यवर उपस्थिती: विद्यामंदिराचे मुख्याध्यापक माननीय श्री. सुनील पवार सर, स्नेहदर्पण सेवा फाउंडेशन जळगावचे अध्यक्ष श्री. पवन खंबायत आणि सचिव श्री. अमोल चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यामंदिराच्या उपशिक्षिका सौ. पुनम पाटील यांनी अत्यंत कुशलतेने केले.

Darpaan Jagat