Advertisement

चिमुरडीवर कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला…

नांदेड – माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून अखेर एका सात वर्षांच्या चिमुरडीवर कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित चिमुरडी शिकवणीसाठी जात असताना अचानक मोकाट कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर हल्ला करत अंगावर धाव घेतली. चिमुरडीच्या आरडाओरडमुळे समोरील इमारतीतील डॉ. नागरगोजे यांनी तात्काळ बाहेर येत प्रसंगावधान राखून तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली.

 

सुदैवाने मोठी दुखापत टळली, परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून वारंवार नागरिकांवर धाव घेण्याच्या घटना घडत आहेत. तरी देखील नगर पंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस व प्रभावी कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील चाकण येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची ताजी घटना असतानाही माहूरमध्ये अशी घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Darpaan Jagat