Advertisement

“सावर्डेत शेतकरी मेळावा संपन्न: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा – डॉ. युवराज येडूरे”

सावर्डे, कागल: शासनाच्या विविध योजनांचा योग्य फायदा घेत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. नवीन प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवावे, असे महत्त्वाचे आवाहन स्वराज कल्याण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. युवराज येडूरेयांनी केले. ते कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथे आयोजित शेतकरी मेळावा व कृषी फवारणी पंप वितरण कार्यक्रमात बोलत होते.

मेळाव्याची सुरुवात आणि अध्यक्षीय उपस्थिती

  • कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून आणि नांगर पूजनाने करण्यात आली.

  • या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक जी. टी. निकम हे होते.

शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांची एकजुट हवी: शितल फराटके

फराटकेवाडीच्या सरपंच शितल फराटके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शेतकरी हयात असेपर्यंत शेतात दिवसरात्र काष्ट करतो, पण ऊस आणि इतर शेतमाल बाजारपेठेत नेल्यावर त्याला कवडीमोल भावासाठी झगडावे लागते, हे दुर्दैव आहे. शेतमालाला योग्य आणि मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित (एकजुट) असले पाहिजे.

१६० शेतकऱ्यांना कृषी पंपांचे वाटप

  • कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुनील पाटील यांनी केले.

  • या मेळाव्यात एकूण १६० शेतकऱ्यांना फवारणी कृषी पंप वाटप करण्यात आले आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला.

मान्यवरांचा सहभाग व उपथिती

कार्यक्रमाला सुनील पाटील, समीर सरसे, सीमा पाटील, अशोक पाटील, संपत्ती माने, एम. ई. लोहार, निजाम शेख, दत्तात्रय हिरुगडे, बंडेराव म्हातुगडे, हिंदुराव कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास पाटील, विवेक माने, लक्ष्मण पाटील आणि मच्छिंद्र माने यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार समीर सरसे यांनी मानले, तर सूत्रसंचालन सुरेश सरसे यांनी केले.

Darpaan Jagat