Advertisement

आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी व होर्डिंगबाजी टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन आमदार राजूमामा यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजप पदाधिकारी व नगरसेवकांनी १,००० वह्यांचे संकलन केले.
या उपक्रमाअंतर्गत रविवारी जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे वह्या व दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजप प्रदेश सदस्य संतोष इंगळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन मिलिंद गोविंद चौधरी व उदयजी भालेराव यांनी केले. जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील १,००० विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वितरण करण्यात आले. शाळा सुरू होताच शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी उपस्थितांनी आमदार राजूमामा भोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, प्रकाश पंडित, आनंद सपकाळे, अजित राणे,पवन खंबायत, दिपक बाविस्कर, विनोद मराठे, अतुल बारी तसेच भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
Darpaan Jagat