Advertisement

स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील व उपमहापौर मनोज चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील निमखेडी परिसरातील प्रसिद्ध श्री शिवधाम मंदिर येथे शिवशक्ती महिला मंडळातर्फे देवी मातेची प्राणप्रतिष्ठापना आणि महाआरतीचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. जळगाव महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती डॉ. श्री. चंद्रशेखर पाटील आणि उपमहापौर श्री. मनोज चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धार्मिक सोहळा संपन्न झाला.

दोन दिवसांचे नियोजन आणि महिलांची जिद्द ठरली विशेष आकर्षण

या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, परिसरातील महिलांनी एकत्र येत अवघ्या दोन दिवसांच्या अल्पावधीत अचूक नियोजन करून देवी मातेची प्रतिष्ठापना केली. महिलांच्या यात्मक व संघटित कार्याची परिसरात जोरदार चर्चा असून, नागरिकांकडून महिला मंडळाच्या या उल्लेखनीय उपक्रमाचे अभूतपूर्व कौतुक केले जात आहे.

मान्यवरांची व नागरिकांची लक्षणीय उपस्थिती

या मांगलिक प्रसंगी जळगाव महापालिकेचे स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी विशेष उपस्थिती लावून देवी मातेचे दर्शन घेतले व आरती केली. तसेच शिवशक्ती महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निमखेडी परिसरातील बहुसंख्येने नागरिक या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले होते.

या यशस्वी आयोजनात अनिता पाटील, रानी पाटील, ललिता सनेर, ममता कोळी, बेबाबाई पाटील यांच्यासह शिवशक्ती महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि जयघोषाने संपूर्ण शिवधाम मंदिर परिसर भक्तीमय झाला होता.

Darpaan Jagat