Advertisement

रेल्वे हल्ला आणि भोर अत्याचार प्रकरणी एकता संघटना आक्रमक; प्रशासनाला इशारा

जळगाव – जळगाव जिल्हा एकता संघटनेच्या वतीने दोन गंभीर घटनांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ठोस पाऊल उचलण्यात आले.  बरेली येथे चालत्या ट्रेनमध्ये मौलाना तौसीफ रजा मजहरी यांच्यावर झालेल्या हल्ला व संशयास्पद मृत्यू प्रकरणी तसेच पुणे जिल्ह्यातील भोर येथे चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करणारी निवेदने सादर करण्यात आली.
ही निवेदने आरडीसी श्रीमती वैशाली चव्हाण यांना जकी पटेल, मौलाना कय्युम आणि एरंडोल येथील रहीम शेख यांच्या हस्ते देण्यात आली.
*दोन्ही घटनांबाबत संताप व्यक्त*
एकता संघटनेने आपल्या दोन्ही निवेदनात स्पष्ट केले की,
बरेली येथील घटनेत चालत्या ट्रेनमध्ये एका धर्मगुरूवर हल्ला होऊन त्यांचा संशयास्पद मृत्यू होणे हे रेल्वे सुरक्षेचे भीषण अपयश आहे. तर भोर येथील चिमुकलीवरील अत्याचार ही मानवतेला काळिमा फासणारी घटना असून अशा घटनांमुळे समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे.
*न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही — ही केवळ मागणी नाही, तर जनतेचा आवाज आहे.” फारुक शेख*
एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी  प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की:
 “जर अशा गंभीर प्रकरणांमध्ये तात्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही,
तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू.
न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही — ही केवळ मागणी नाही, तर जनतेचा आवाज आहे.” असे ते पत्रकारांना  म्हणाले
*मुख्य मागण्या*
१) दोन्ही प्रकरणी एस आय टी / सी बी आय मार्फत उच्चस्तरीय चौकशी
२) आरोपींची तात्काळ अटक व कठोर कायदेशीर कारवाई
३) संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे
४) पीडित कुटुंबांना आर्थिक मदत व न्याय
५) सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करणे.
*सकारात्मक भूमिका*
एकता संघटनेने हेही नमूद केले की, सरकारने तात्काळ आणि पारदर्शक कारवाई केल्यास
जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल आणि अशा घटनांना आळा बसेल.
“आमचा उद्देश केवळ निषेध नाही, तर व्यवस्थेत सुधारणा आणि न्याय मिळवून देणे आहे,” असे फारुक शेख यांनी स्पष्ट केले.
*शिष्टमंडळात यांची होती उपस्थिती*
 एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख  यांच्या नेतृत्वात ॲडव्होकेट आवेश शेख व आमिर शेख,
सलीम इनामदार, मौलाना गुफरान,  जकी पटेल,  अख्तर शेख, मुजाहिद खान, वसीम शेख, रहीम शेख (एरंडोल), शेख सलीम व अन्वर शेख (नशिराबाद), मजहर खान, ताहेर शेख, अनिस शाह, सईद शेख, अन्वर शिकलगर सह इतर  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Darpaan Jagat