वरिष्ठ गट मुले जिल्हास्तरीय निवड चाचणी
सिनिअर बॉईज (वरिष्ठ गट मुले) राज्यस्तरीय आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धा (टीअर वन) सांगली येथे ०१ एप्रिल २०२६ पासून सुरु होत आहे. त्यासाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघ निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा संघ निवड चाचणी दिनांक १८ मार्च २०२६ पासून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज, भुसावळ रोड, जळगाव येथील फुटबॉल ग्राउंड वर जिल्हासंघ निवड चाचणीला सुरवात होत आहे.
आवश्यक कागद पत्रे
खेळाडू हा जळगाव जिल्ह्यातीलच असावा त्यासाठी खेळाडूंनी आपल्या जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड व संपूर्ण किट सह दि. १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज, भुसावळ रोड, जळगाव येथे उपस्थिती द्यावी असे आवाहन जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, सचिव फारुक शेख, कार्याध्यक्ष प्रा.डॉ. अनिता कोल्हे यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.














