जळगाव – प्रतिनिधी-
प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, जळगाव शहराच्या सुशोभीकरणात आणखी एक पाऊल पडत आहे.
‘स्थानिक आमदार विकास निधी २०२५-२६’ अंतर्गत डॉ. हेडगेवार चौक सुशोभीकरण व नूतनीकरणाचा भूमीपूजन सोहळा उत्साहात पार पडला.
आमचे नेते नामदार श्री. गिरीषभाऊ महाजन (जलसंपदा व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य), जळगाव शहर आमदार श्री.सुरेश दामू भोळे (राजू मामा) आणि प्रसिद्ध उद्योजक श्री. रजनीकांतजी कोठारी यांच्या शुभहस्ते हा विधी संपन्न झाला.
शहराचा विकास आणि थोर महापुरुषांच्या स्मृतींचे जतन करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.
यावेळी जळगावच्या महापौर दीपमालाताई काळे, उपमहापौर मनोज चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, भाजपा गटनेते प्रकाश बालाणी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सर्व सन्मानीय नगरसेवक, पदाधिकारी व जळगावकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














