Advertisement

जळगावमध्ये अस्मिता खेलो इंडिया महिला सिटी लीग व्हॉलीबॉल स्पर्धा

 

जळगाव : भारत सरकारच्या खेलो इंडिया अंतर्गत अस्मिता फाउंडेशन तर्फे संपूर्ण भारतात मुलींच्या विविध स्पर्धा खेळवल्या जात आहे त्यात व्हॉलीबॉल मुलींसाठी जळगाव जिल्हाच्या स्पर्धा ४ व ५ एप्रिल जळगाव शहरातील विद्या इंग्लिश मिडियम स्कूलच्या मैदानावर घेण्याचे नियोजन केलेले आहे.

जिल्हास्तरीय १६ संघांचा सहभाग असेल

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या १६ संघाना प्रवेश निश्चित करण्यात येईल. हे १६ संघ कॉलेज ज्यू. कॉलेज, शाळेचे, क्लब किवा अकॅडमीचे असू शकतात. सहभागी सर्व संघाना अस्मिता खेलो इंडिया प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रथन, द्वितीय आणि तृतीय संघाना मेडल व ट्रॉफी देण्यात येईल.

२ एप्रिल पर्यंत प्रवेश

ज्या संघ कॉलेज, ज्यू. कॉलेज, शाळेचे, क्लब किवा अकॅडमी ला आपला संघ पाठवायचा असेल त्यांनी २ एप्रिल पर्यंत आपल्या संघाचे प्रवेश जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेकडे लेखी स्वरुपात कळवावे

अधिक माहितीसाठी संपर्क

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता आपल्या संघाची नाव नोंदणी खालील पदाधिकार्यांशी संपर्क साधावा असे आव्हाहन व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार साहेब मा.श्री. प्रा. चंद्रकांत सोनावणे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रदीप तळवलकर सचिव :- प्रा. डॉ. देवदत्त पाटील

यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे

१) डॉ. सचिन पाटील मो. नं. ८२०८२७५९९२

२) श्री सुरज बराडे मो.न.८९५६८१२२२३

३) श्री क्षितीज सोनावणे मो. नं. ८८८८०००२११

४) श्री. लौकिक मुंदडा मो.नं. ९४२३९७५९८४

Darpaan Jagat