Advertisement

शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी शुभांगीताई पाटील आक्रमक; शिक्षण उपसंचालक राठोड यांची भेट घेऊन मांडल्या प्रलंबित मागण्या!

धुळे : राज्यातील शिक्षकांवर अन्यायकारक ठरणाऱ्या टीईटी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेनेच्या राज्य उपनेते तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक श्री राठोड साहेब यांची नाशिक येथे भेट घेतली.
याप्रसंगी श्रीमती शुभांगी ताई पाटील यांनी टीईटी परीक्षा रद्द करण्याच्या मागणी संदर्भात राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची कल्पना देत सदर परीक्षा नोकरीवर असलेल्या शिक्षकांवर कशाप्रकारे अन्यायकारक आहे याची कल्पना देत ती रद्द करण्याची मागणी शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. त्याचबरोबर नाशिक विभागातील अनेक शिक्षकांचे कर्मचाऱ्यांचे शाळांचे व संस्थांचे असंख्य कामे आपल्या कार्यालयाकडे प्रलंबित असल्याचे सांगत एसआयटी चौकशी मुळे जरी कामे प्रलंबित असतील तरी ज्या संस्था व शाळा एसआयटी चौकशीत नाहीत व ज्यांची कामे ही नियमाप्रमाणे व कायद्याच्या चौकटीत आहेत अशी प्रलंबित असलेली संच मान्यता, शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता, सेवा सातत्य अशी कामे आपल्या कार्यालयाकडून तात्काळ करण्यात यावेत अशी मागणी यावेळी शिक्षक नेत्या शुभांगी ताई पाटील यांनी केली.
याप्रसंगी शुभांगी ताई पाटील यांच्यासमवेत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र भदाणे सर, संस्था चालक संजय अण्णा भामरे, ॲड विवेक सूर्यवंशी, मोहन अहिरे सर, पाटील सर यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक व संस्थाचालक उपस्थित होते.

Darpaan Jagat