Advertisement

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघ रवाना

जळगाव : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन अर्थात महाराष्ट्र फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धा १ एप्रिलपासून सांगली येथे सुरू होत आहेत. जळगाव जिल्ह्याचा समावेश सांगली विभागात करण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी मागील १२ दिवसांपासून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज क्रीडांगण येथे पार पडली. राष्ट्रीय खेळाडू व जैन इरिगेशनचे कर्णधार अरबाज खान यांच्या नेतृत्वाखाली निवड प्रक्रिया झाली. निवड समितीत भास्कर पाटील, मनोज सुरवाडे, नितीन व जोसेफ यांनी कार्य केले.
एकूण ५० खेळाडूंमधून अंतिम २० खेळाडूंची निवड करण्यात आली.
संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी खेळाडूंसमक्ष संघाची घोषणा केली.
मान्यवरांची उपस्थिती व शुभेच्छा
संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार व राष्ट्रीय खेळाडू प्रा. चंद्रकांत सोनवणे, प्राचार्य डॉ. विजय पाटील, भास्कर पाटील, प्रा अनिता कोल्हे, ताहेर शेख, हिमाली बोरोले, आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार सोनवणे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना आपल्या महाविद्यालयीन काळातील संघर्षमय अनुभव सांगत, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या शब्दांनी खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.

क्रीडा संकुल लवकरच खेळाडूंसाठी खुले
यावेळी संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी जिल्हा क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होऊनही ते खेळाडूंना उपलब्ध नसल्याची बाब मांडली व लवकरात लवकर लोकार्पण करण्याची मागणी केली.
यावर आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, पालकमंत्र्यांशी चर्चा करून येत्या आठवड्यात क्रीडा संकुल फुटबॉल सामन्यांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत शासकीय पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
जळगाव जिल्हा संघाकडून राज्यस्तरावर उत्कृष्ट आणि दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात असून, संपूर्ण जिल्ह्याच्या शुभेच्छा संघासोबत आहेत.

निवड झालेला संघ
साबीर शेख (व्यवस्थापक)
वसीम शेख रियाझ (प्रशिक्षक)

खान अरबाज सत्तार (कर्णधार), वसीम चांद, खान तौसीफ हनीफ, निरज पाटील, पार्थ राजे, दीपक सस्ते, अमेय तळेगावकर, अर्पित वानखेडे (उपकर्णधार), शेख झकी साबीर , हर्षल गोकुळ, डेनिस चेल्स, कुणाल माळी, यश दोडे, कार्तिक अधिक, दीपक कोळी, कुलदीप पाटील,शाहिद शेख, मुकसीद शेख, पंकज पाटील, कार्तिक मनोज
राखीव खेळाडू
निखिल पाटील , निहालअहमद , हर्ष,विजय लक्ष्मण बारेला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भास्कर पाटील यांनी मांडले.

Darpaan Jagat