जळगाव : लोक शिक्षण मंडळ जळगाव संचलित स्वा. सै.ज . सु.खडके प्राथमिक विद्यामंदिरामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कब बुलबुल पथकाचा शपथविधी संपन्न झाला. सदर प्रसंगी लोकशिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सिंधुताई कोल्हे, चिटणीस श्री अवधूत पाटील सर, मुख्याध्यापक श्री सुनील पवार सर यांच्या शुभहस्ते इयत्ता तिसरीच्या कब आणि बुलबुल च्या विद्यार्थ्यांना स्कार्फ घालून त्यांचा प्रवेश प्रदान सोहळा संपन्न करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली व झेंडा गीत व कब बुलबुल प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कब मास्टर श्री याकुब तडवी सर व श्री लिलाधर किरंगे सर , फ्लॉक लीडर सौ. पूनम पाटील व सौ.रिता पिंपरकर यांचे सहकार्य लाभले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फ्लॉक लीडर सौ. अर्चना पाटील यांनी केले. शेवटी खाऊ वाटप करण्यात आला.
ज सु खडके प्राथमिक विद्यामंदिरात कब बूलबुल पथक शपथविधी संपन्न














