जळगाव : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर जिल्ह्याच्या वतीने जल, जंगल आणि जमीन यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे, आदिवासी समाजात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे तसेच ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारणारे महान क्रांतिकारक जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त भाजपा कार्यालय, जी. एम. फाउंडेशन, जळगाव येथे अभिवादन करण्यात आले.यावेळी जळगाव शहराचे आमदार मा. श्री. सुरेश दामू भोळे (राजूमामा) तसेच जळगावच्या प्रथम नागरिक मा. महापौर सौ. दिपमाला ताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी भाजपा सरचिटणीस नितीन जी इंगळे,राहुल जी वाघ, जेयष्ट भाजपा कार्यकर्ते उपाध्यक्ष उदयजी भालेराव,राजेंद्र मराठे,मिलिंद चौधरी,पवन खंबायत,मनोज भांडारकर,संजय शिंपी,प्रकाश पंडित, मयूर भदाणे, मंडळ अध्यक्ष अतुल बारी,सुरेश सोनवणे,दिपक कोळी, संजय नारखेडे,महेश चौधरी,तुषार सूर्यवंशी,युवा मोर्चा पदाधिकारी हर्षल सोनवणे,भूषण काकडे,किरण भोई,जितेंद्र चव्हाण,युवराज सपकाळे,डॉ.नितीन पाटील,चंद्रकांत शिंदे,इ.
पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भगवान बिरसा मुंडा यांचे राष्ट्रनिर्माण व समाजजागृतीसाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
जननायक भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन ….













