Advertisement

भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त जळगावात ‘कृतज्ञता सोहळा’ संपन्न


जळगाव: भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरात ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘कृतज्ञता सोहळा’ उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी समाजातील विविध स्तरांतील ४६ महिला व पुरुष नागरिकांचा गौरव करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या सोहळ्याला भाजपच्या ज्येष्ठ नेत्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार श्री. सुरेश दामू भोळे (राजुमामा) आणि महानगर जिल्हाध्यक्ष श्री. दीपकभाऊ सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या नेत्यांनी उपस्थित सर्व ४६ नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पक्षाच्या जडणघडणीत प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
प्रभु श्रीराम अयोध्या मंडळ (मंडळ क्र. ४) मधील नागरिकांच्या वतीने नगरसेवक प्रदीपदादा रामकृष्ण रोटे, भाजप मंडळ ४ सरचिटणीस किसन भगवान मराठे आणि भाजप निमंत्रित सदस्य श्री. अशोक महादेव कोष्टी यांनी विशेष पुढाकार घेतला.
या कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. विरणदादा खडके, नगरसेविका सौ. रंजनाताई वानखेडे, भाजप महानगर कोषाध्यक्ष श्री. विजयदादा केशवराव वानखेडे, भाजप मंडळ ४ अध्यक्ष श्री. विनोद रमेश मराठे, आणि मंडळ ४ उपाध्यक्ष श्री. योगेश प्रभाकर डोळे यांची विशेष उपस्थिती होती.
या सोहळ्याला जळगाव शहरातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे विविध आघाड्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पक्षाप्रती निष्ठा आणि समर्पणाची भावना या कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Darpaan Jagat