“न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील!”- एकता संघटन
जळगाव : नाशिक येथील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात तसेच अहिल्यानगर येथे अल्पवयीन हिंदू मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज एकता संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या. “हिंदू महिला न्याय मिळवण्यासाठी मुस्लिम महिला पुढे आल्या”
एकता जिंदाबाद — अन्याय मुर्दाबाद!”
“धर्म नाही, न्याय मोठा — अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा हवीच!”
भोंदू महाराजांना संरक्षण देणाऱ्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे!”*
“महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना फाशीच हवी!”
या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. महिलांनी विविध आक्रमक घोषणा देत शासनाचे लक्ष वेधले व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर एकता संघटनेतर्फे सविस्तर निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना देण्यात आले. हे निवेदन आलेमा नाझिया शेख यांच्या हस्ते सादर करण्यात आले.
निवेदनातील मागण्या
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, धर्माच्या नावाखाली महिलांवर व अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत. तसेच, अशा भोंदू प्रवृत्तीला पाठबळ देणाऱ्या राजकीय नेते व अधिकारी वर्गावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आलेमा नाझिया शेख व एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी मार्गदर्शन करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला की,
“आज मुस्लिम महिला व पुरुष हिंदू भगिनींसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. यापुढेही मुस्लिम समाज हा आमच्या हिंदू रणरागिणींच्या संरक्षणासाठी सदैव पुढे राहील.”
संघटनेने शासनाला इशारा दिला आहे की, जर या प्रकरणात तात्काळ व कठोर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
खालील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला प्रतिनिधी नाझिया शेख व पुरुष प्रतिनिधी फारुक शेख यांच्या नेतृत्वात सुमारे शंभरच्या वर महिला त्यात प्रामुख्याने मौलाना रहीम पटेल , मौलाना गुफरान ,मौलाना इम्रान काकर, श्रीमती शबीना हरीश, सौ. रिजवान रहमान, सौ सकीना शेख इस्माईल, सौ हाजरा फारुख शेख, बुशरा आमिर शेख, सायमा उमर शेख, निखत ताहेर, मतीन पटेल, अनिश शाह, आरिफ देशमुख, सईद शेख, ताहेर शेख, रऊफ टेलर, अकील शेख, मुजाहिद खान, काशिफ शेख, तौसिफ खान, वसीम रियाज आदींचा समावेश होता














