Advertisement

सुपर डुपर हा चित्रपट येत्या 3 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस…

धमाल मनोरंजनाची मेजवानी असणाऱ्या सुपर डूपर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
ट्रेलरमध्ये एका घराभोवती फिरणारा गंमतीदार गोंधळ दिसत आहे. एका बाजूला परंपरा जपणारे गावाकडचे कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची कास धरणारी शहरातलं तरुण जोडपं. या दोन्ही कुटुंबांना एकाच फ्लॅटची विक्री होते आणि या घराच्या ताब्यावरून वादाची ठिणगी पडते. आता एकच घर आणि राहणारे दोन टोकाचे गट… दोघांची जीवनशैली, सवयी आणि विचार अगदी वेगळे असल्यामुळे एकत्र राहतानाची त्यांची मजेशीर जुगलबंदी ट्रेलरमध्ये दिसत आहे.नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे हे या चित्रपटाचे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. तर छायांकन संजय जाधव यांनी केले आहे. निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत..

Darpaan Jagat