Advertisement

भाजपा छत्रपती शिवाजी महाराज मंडळ क्रमांक – १ यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाबद्दल स्वच्छता मोहीम व रोप लावण्याचा कार्यक्रम संपन्न

जळगाव: २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर सलग तीन वेळा जनतेचा विश्वास संपादन करून, १० जून २०२६ रोजी त्यांनी ४३९९ दिवस पूर्ण केले. यामुळे ते भारताचे सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे निर्वाचित पंतप्रधान ठरले, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ४३९८ दिवसांचा विक्रम त्यांनी मोडीत काढला म्हणूनच दि. १० जून २०२६ बुधवार स. १० वा. भारतीय जनता पार्टीच्या जळगाव महानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ क्रमांक १ यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर डॉ. केशव बळीराम हेडगेवार जॉगिंग पार्क येथे स्वच्छता मोहीम व रोप लावण्याचा कार्यक्रम साजरा  झाला त्यासाठी जळगाव शहराच्या खासदार मा.श्रीमती स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे विकास पुरुष व आमदार श्री.सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते,भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष श्री.दिपक सूर्यवंशी हे उपस्थितीत होते.
“४३९९ दिवस हे वैयक्तिक यश नाही, तर सामूहिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे,”  हा काळ केवळ संख्या नाही, तर ‘नवभारत’ घडवण्याचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. विकसित भारत २०४७ दृष्टीने हा केवळ १२ वर्षांचा आढावा नाही, तर २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचा संकल्प आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्राने चाललेल्या या प्रवासात जनसहभाग महत्त्वाचा राहिला आहे. ४३९९ दिवस हे केवळ आकडेवारी नाहीत. हे भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि डिजिटल परिवर्तनाचे प्रतीक आहेत. पुढील वर्षांतही या गतीने विकास आणि सेवा चालू राहील. असे पंतप्रधान मोदी यांनी स्वतः सांगितले.
ह्यावेळेस महानगर सरचिटणीस विशाल भाऊ त्रिपाठी राहुल भाऊ वाघ मंडळाचे अध्यक्ष आनंद सपकाळे सरचिटणीस राहुल सनकत, मा. नगरसेवक व जळगाव शहर उपाध्यक्ष राजूभाऊ मराठे नगरसेवक विजय बांदल ,निलेश आबा तावडे, विजय जगताप ,महेश चौधरी ,स्वप्निल साखळीकर ,पवन खंबायत, अमोल चव्हाण,दिलीप नाझरकर, तुषार सूर्यवंशी, दीपक कोळी, दिनेश पुरोहित, संदीप पवार, हर्षल सिखवाल ,आकाश मंडोरा ,वसीम शेख नूतन मराठा कॉलेजचे देशमुख सर खो खो प्रशिक्षक विजय तायडे सर अंकुश कोळी तसेच खो खो मधील खेळाडू आणि तसेच भा.ज.पा जळगाव जिल्हा महानगरचे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा मोर्चा/आघाडी/प्रकोष्ठ पदाधिकारी, मा. नगरसेवक, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख तसेच सर्व कार्यकर्ते हे सर्व उपस्थित होते.
Darpaan Jagat