मोर्शी: भारतीय महाविद्यालय, मोर्शी येथे २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) वर्धापन दिन अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संकल्पनेनुसार (Theme) विविध उपक्रमांचे नियोजन या प्रसंगी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोषजी आगरकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. संदीप राऊत उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रजनीश बांबुळे आणि डॉ. भगवान साबळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व पूजन करून झाली. यानंतर महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. लाजवंती टेंभुर्णे यांनी प्रास्ताविक मांडले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. संतोषजी आगरकर यांनी ‘राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रउभारणीत युवकांचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “विद्यार्थी स्वतःच्या बुद्धी, श्रम आणि धन या तीन सूत्रांचा अवलंब करून राष्ट्रउभारणीत मोलाचे योगदान देऊ शकतात. राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रत्येक स्वयंसेवक या तीन घटकांपैकी कोणत्याही एका माध्यमाचा वापर करून समाजाची व राष्ट्राची सेवा करू शकतो.” तर
प्रमुख मार्गदर्शक डॉ. संदीप राऊत यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थामध्ये सेवा , समर्पण , संकल्प , आयोजन , संकल्प या पाच सुत्राचा अवलंब स्वयंसेवकाने करावा तसेच माणसाची ओळख हि त्याचे काम असते व त्यातून जीवनाचा मार्ग सापडत जातो . व्यक्तिमत्वावर त्याचा कसा सकारात्मक प्रभाव पडतो याचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. गोपाल भलावी हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. लाजवंती टेंभुर्णे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. गोपाल भलावी यांनी मानले कार्यक्रमाला ग्रंथपाल डॉ.अरविंद पाझारे, प्रा . सुरेंद्र पांडे, प्रा . पळसापुरे मॅडम, यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कु . गायत्री सोरते, कु . दिव्याणी बाटे, हर्षल निंभोरकर , प्रतिक निकम आदिंनी परिश्रम घेतले.
(अमरावती जिल्ह्य प्रतिनिधी
संजय वानखेडे)













