Advertisement

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

जळगाव , प्रतिनिधी – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजीत १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणी हे अनुभूती निवासी स्कूल च्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणावर घेण्यात आली. या निवड चाचणी मध्ये जिल्ह्यातील विक्रमी ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे अधिकृत असलेल्या या निवड चाचणीमध्ये ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड करण्यात आली. निवड चाचणी अध्यक्ष संजय पवार यांच्या निवड समितीने ही निवड केली. याप्रसंगी निवड समितीचे निमंत्रक व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे  सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते. त्यांच्यासोबत संतोष बडगुजर, हितेश पटेल, सुयश बुरूकुल यांनी विशेष सहकार्य केले. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या मार्गदर्शनातून झालेल्या  निवड चाचणीमध्ये निवड झालेल्या ८८ खेळाडूंची १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान विविध संघांमध्ये सामने खेळविले जाणार आहेत. हे सामने अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर होतील. यातून अंतिम २५ खेळाडूंची निवड केली जाईल.

Darpaan Jagat