Advertisement

आयुष्मान भारत योजनेचा फज्जा? जळगावात पात्र रुग्ण उपचारापासून वंचित; प्रशासनाला निवेदन

जळगाव : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुषमान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गरीब व गरजू रुग्णांसाठी आधार ठरणे अपेक्षित असताना, जळगाव जिल्ह्यात अनेक पात्र नागरिकांना आयुषमान भारत कार्ड सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांना उपचारासाठी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. “सरकारी योजना कागदावर नको, गरिबांच्या उपचारासाठी प्रत्यक्षात दिसली पाहिजे,” असा आक्रमक इशारा देत या व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी एकता संघटन व आसरा मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन आज जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात अप्पर जिल्हा शल्यचिकित्सक शिवदास चौहान यांना कासिम उमर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी फारुक शेख, मतीन पटेल, अनवर शेखलकर व मजमुद्दीन शेख आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, अनेक पात्र नागरिकांकडे अद्याप आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध नाही. अचानक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कार्ड नसल्यामुळे योजनेचा तात्काळ लाभ मिळत नाही. गरीब कुटुंबाला उपचारासाठी कर्ज काढावे लागते किंवा नातेवाईकांकडे मदत मागावी लागते. एकीकडे सरकार आयुष्मान भारतच्या माध्यमातून लाखो रुपयांपर्यंत मोफत उपचाराची घोषणा करते आणि दुसरीकडे पात्र गरीब नागरिक कार्ड व नोंदणीच्या तांत्रिक प्रक्रियेत अडकतो, ही बाब गंभीर आहे. विशेषतः सरकारी योजनेचा गैरवापर होणार नाही याची काटेकोर तपासणी प्रशासनाने करावी; मात्र गैरवापर रोखण्याच्या नावाखाली खऱ्या गरीब व पात्र रुग्णाला उपचारापासून वंचित ठेवले जाऊ नये, अशी ठाम भूमिका फारुक शेख यांनी यावेळी मांडली. योजनेचा लाभ नेमका गरजूंपर्यंत पोहोचतो आहे की नाही, याचीही प्रशासनाने नियमित तपासणी करावी, अशी मागणी सुद्धा आसरा चे कासिम उमर यांनी केली. निवेदनाद्वारे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र आयुष्मान भारत नोंदणी व तत्काळ कार्डनिर्मिती केंद्र सुरू करणे, रुग्णालयात दाखल झालेल्या पात्र रुग्णांची तातडीने पडताळणी करून जागेवरच कार्ड तयार करणे, प्रत्येक विभागात स्वतंत्र मदत कक्ष सुरू करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये नियमित नोंदणी मोहीम राबवणे आणि पात्र नागरिकांना अडचणीविना लाभ मिळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. “गरिबांच्या आरोग्यासाठी असलेल्या

Darpaan Jagat