Advertisement

जळगावातून पेटली ऐक्याची मशाल: ‘सकल ब्राह्मण समाजा’चा राज्यभर हुंकार!

जळगाव – सकल ब्राह्मण समाज एकजुटीची चळवळ भगवान परशुराम जन्मोत्सवाने जळगावातुन सुरु होऊन महाराष्ट्र भर पसरुन गावोगावी मोठ्याप्रमाणात जन्मोत्सवाचे आयोजन होत आहे. यात सर्व शाखा व भाषा भेद बाजुला सारुन वर्षातुन एकदा एका दिवशी एका ठिकाणी सकल ब्राह्मण समाजाने एकत्रीत यावा याचा विशेष बहुभाषिक ब्राह्मण संघ आग्रही असतो.

भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचे यंदा १७ वे वर्ष असुन लागोपाठ सतराव्या वर्षी देखील विशाल आयोजनाने जन्मोत्सव साजरा होणार आहे. या विशाल ब्राह्मण एकता मेळाव्याचे यशस्वीते करीता ४०० हून अधिक स्वयंसेवक श्रमदान करीत असुन दानशुरांच्या अर्थ दानाने आयोजन यशस्वी केले जात आहे.

यंदाच्या जन्मोत्सवाची सुरुवात रविवार, दिनांक ०५ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराने संपन्न झाली.

रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी विराट मोटर सायकल रॅली सायं. ५ वा महाबळ चौकातून हजारोंच्या संख्येत निघणार आहे. महाबळ चौकातुन रॅली पुढे काव्यरत्नावली चौक, रिंगरोड मार्गे शाश्त्रीटाॅवर, सुभाष चौक, पांडे डेअरी चौक, विर सावरकर पुतळ्यावरून पोलिस मल्टीपरपज हालवर समापन होणार आहे. सायं. ७ वा. याच ठिकाणी दानदाते व श्रमदाते गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्राह्मण एकता दिवसाचा मुख्य कार्यक्रम रविवार, दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वाजता परशुराम पुजन ग्राम दैवत श्री राम मंदिरात होऊन दुपारी ४.३० वाजता सुभाष चौकातुन निघणार आहे. शोभायात्रेत सालाबादा प्रमाणे भव्य दिव्य भगवान परशुराम रथा सह वाजतगाजत ढोल ताशा लेझिम व दांडिया पथकसह सहभागी होऊन धुम धडाक्याने हजारोंच्या सहभागाने विराट अशी शोभायात्रा निघणार आहे.

शोभायात्रेत महिलांचे तलवार बाजजी दांडपट्टा प्रात्यक्षिकासह ढोल पथके, लेझीम व दांडीया पथके सहभागी होणार असुन पथकांच्या सरावाला हनुमान जयंती पासुन सुरुवात झाली असुन ते यंदाचे देखील आकर्षण राहणार आहे. विराट शोभायात्रेचे समापन शिवतिर्थावर होईल.

जन्मोत्सवात नाविन्यता आणणेस कल्पकतेने आगळे वेगळे उपक्रम सातत्याने साकारले जातात. मागील वर्षी तालुका स्तरावर समाज संगठीत व्हावा म्हणून ९ तालुक्यांना भगवान परशुरामांच्या कायम स्वरुपी मुर्ती विनामुल्य देण्यात आल्या.

यंदा देखील वेगळे पण राखत निमंत्रण पत्रिके ऐवजी तब्बल २८ पानी मराठी नववर्ष दिनदर्शिका शास्त्र शुद्ध तिथिसह प्रकाशित करण्यात आली आहे. दिनदर्शिकेत सर्व ब्राह्मणांच्या मुळ कुळ पुरुषाची माहीती प्रकाशीत केली आहे ज्यांच्या पासुन प्रत्येक शाखेची उत्पत्ती आहे. अनेक समाजोपयोगी माहीती दिनदर्शिकेत समाविष्ट असुन समाजात आपसात संपर्क वाढुन ऐकोपा घडावे. असे या मागील उद्देश असल्याचे श्रीकांत खटोड यांनी सांगीतले.

आयोजनाच्या यशस्वीते करीता सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्त्यांमध्ये खुप उत्साह असुन अतिशय जोमाने सर्व जण तयारीला लागल्याचेही सर्वानी याठिकाणी नमूद केले.

यदा भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ च्या अंतर्गत वर्षभरात विवीध व्याख्यानाचे व स्नेह संन्मेलनाचे देखील आयोजन छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह व गंधे सभागृहात आयोजित करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष ॲड.ओम त्रिवेदी यांनी नवी पेठ येथील हनुमान मंदीरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी विद्यमान अध्यक्ष प्रतिथयश विधीज्ञ ॲड.ओम त्रिवेदी, श्रीकांत खटोड, माजी अध्यक्ष नितीन पारगावकर, सहसचिव पंकज पवनीकर, माजी अध्यक्ष सुरेद्र मिश्रा, राजेश नाईक, शिव शर्मा, गोपाल पंडीत, व महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुधाताई खटोड, नूतन अध्यक्षा पूनम तिवारी, प्रसिद्धी प्रमुख मनीष पात्रीकर उपस्थित होते.

Darpaan Jagat