Advertisement

रावेर गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचा वाद : १२७ नागरिकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक कायदेशीर दाद

जळगाव : रावेर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीचा दीर्घकाळापासून प्रचलित असलेला पारंपरिक मार्ग बदलून संवेदनशील परिसरातून मिरवणूक काढण्यास देण्यात आलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर आज रावेर येथील सुमारे १२७ नागरिकांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे तक्रारवजा अपील सादर केले.
जळगाव जिल्हा एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी हे निवेदन- अपील सादर केले.
 अपर जिल्हादंडा धिकारी यांनी दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या मिरवणूक मार्गाच्या परवानगी आदेशाची तात्काळ अंमलबजावणी स्थगित/रद्द करून, कायदा-सुव्यवस्था आणि सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून दीर्घकाळापासून प्रचलित पारंपरिक मार्ग निश्चित करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
 “परवानगीपेक्षा कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची”
निवेदनात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३६, ३७(१), ३७(३), ४० व ५६, तसेच पोलीस मॅन्युअल रुल ५६ मधील धार्मिक मिरवणुकींबाबतच्या कायदा-सुव्यवस्था संबंधी तरतुदींचा संदर्भ देण्यात आला आहे.
विशेषतः उपलब्ध अधिकृत नोंदी, पूर्वीची कायदा-सुव्यवस्था परिस्थिती आणि मिरवणुकीच्या मार्गाबाबत झालेल्या निर्णयांचा पुनर्विचार करूनच अंतिम निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पोलिसांचीच गंभीरता उघडकीस
निवेदनात रावेर पोलीस स्टेशन एफ आय आर क्र. ३८९/२०२५, दि. ०७/०९/२०२५ तसेच त्यासंदर्भातील तत्कालीन पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या पत्राचा विशेष उल्लेख करून, २०२५ आणि २०२६ मधील परिस्थितीत नेमका काय वस्तुनिष्ठ बदल झाला, ज्याच्या आधारावर यावर्षी नवीन मार्गाला परवानगी देण्यात आली, याची पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
२० सप्टेंबरच्या दगडफेकीच्या घटनेची गंभीर दखल घ्यावी
दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी रावेर परिसरात गणपती विसर्जनाच्या पारंपरिक मार्गावरून मिरवणूक न जाता दुसऱ्या नवीन मार्गाने जात होती त्या मुळे   दगडफेकीची घटना घडल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
या घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने परिस्थिती अधिक संवेदनशील झाल्याचे नमूद करून, प्रशासनाने पूर्वीच्या परवानगीचा तातडीने पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
*रावेर पोलिसांचे नाहरकत आणि गोपनीय अहवाल तपासणी करण्याची मागणी*
नवीन मार्गासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या ना हरकत चा आधार काय होता, त्यासाठी कोणत्या नोंदी व अहवालांचा विचार करण्यात आला, एफ aay आर क्र. ३८९/२०२५, तत्कालीन पोलीस अधीक्षकांचे पत्र, पूर्वीच्या मिरवणुकींच्या नोंदी, ना हरकत आवक/ जावक  क्रमांक आणि संपूर्ण फाईल ट्रेल यांची तपासणी करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
तसेच अपर जिल्हादंडा धिकारी यांनी परवानगी देताना वापरलेल्या डेली गेशन ऑफ पॉवर चे स्वरूप व संपूर्ण फाईलची तपासणी करून निर्णयाची वैधानिकता स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
*जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून योग्य कारवाईचे आश्वासन*
सुमारे १२७ नागरिकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रत्यक्ष भेटले.
*नागरिकांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडून अपर जिल्हादंडा धिकाऱ्यांचा आदेश तात्काळ थांबवावा आणि नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.*
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून संबंधित अहवाल मागवून त्याची पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
*“हा कोणत्याही धर्माच्या मिरवणुकीचा विरोध नाही”- फारुक शेख*
जळगाव जिल्हा एकता संघटने चे फारुक शेख यांनी स्पष्ट केले की, गणेशोत्सव किंवा शांततापूर्ण धार्मिक मिरवणुकीला विरोध हा या निवेदनाचा उद्देश नाही. प्रश्न हा समान कायदा, समान निकष, दीर्घकाळ चालत आलेली प्रथा, सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था यांचा आहे.
शेख यांनी निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, एखाद्या मिरवणुकीला दीर्घकाळ प्रचलित असलेला मार्ग बदलून नवीन संवेदनशील मार्ग उपलब्ध करून दिल्यास, भविष्यात इतर धार्मिक मिरवणुकांच्या मार्गांबाबतही नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्कालिक निर्णयाऐवजी दीर्घकालीन कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
*प्रशासनाने आता लेखी व कारणासहित निर्णय द्यावा*
जिल्हा एकता संघटनेने जिल्हा प्रशासनाला स्पष्ट मागणी केली आहे की—
१) “अपर जिल्हादंडा धिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीची तात्काळ अंमलबजावणी स्थगित/रद्द करावी,
२) २० सप्टेंबरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नव्याने कायदा-सुव्यवस्था Risk Assessment करावे,
३) एफ आय आर क्र. ३८९/२०२५ व संबंधित पोलीस अधीक्षकांच्या पत्राचा पुनर्विचार करावा आणि दीर्घकाळापासून प्रचलित असलेल्या कायदेशीर व सुरक्षित मार्गाबाबत कारणासहित स्पीकिंग ऑर्डर पारित करावा.”
*निवेदनाच्या/ तक्रारीच्या प्रती वरिष्ठ अधिकाऱ्यांना*
या तक्रारवजा अपीलाच्या प्रती पोलीस अधीक्षक, जळगाव; विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र; विभागीय आयुक्त, नाशिक विभाग; पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई; उपविभागीय दंडाधिकारी, पाचोरा; पोलीस निरीक्षक, रावेर; महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, मुंबई; तसेच महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई यांच्याकडेही देण्यात आल्या आहेत.
*शिष्टमंडळात यांचा होता समावेश*
रावेर येथून आसिफ मोहम्मद दारा, इरफान खान, अल्ताफ खान, शेख शाकीर, जावेद खान ,शेख कलीम, मोहम्मद साबीर, मलक रहमान, शेख सलीम, मोहम्मद अमीन, शेख फहिमोद्दीन , एजाजोद्दीन शेख यासह रावेर
येथील सुमारे 127 लोकांचा समावेश होता.
जळगाव एकता संघटन तर्फे फारुक शेख, हाफीज रहीम पटेल, आरिफ देशमुख , या
मझहर खान, अनिस शहा, अमीन शेख,रज्जाक पटेल, राजू पटेल, मौलाना गुफरान आदींची उपस्थिती होती.
Darpaan Jagat