Advertisement

ज सु खडके प्राथमिक शाळेत पालक सभा उत्साहात संपन्न

जळगाव: लोक शिक्षण मंडळ जळगाव संचलित स्वा.स.सै. ज.सु. खडके प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.
सभेत शाळा व्यवस्थापन समिती,‌ सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती, महिला तक्रार निवारण समिती व इको क्लब समिती या समित्यांवर पालकांमधुन सदस्यांची निवड करण्यात आली व नवीन निवड झालेल्या सदस्यांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील गुणवंत विद्यार्थी, व एमटीएस , शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी यांचा पालकांसह सत्कार तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश , वह्या व दप्तर इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती चेअरमन मा.श्रीम.सिंधुताई विजयरावजी कोल्हे, चिटणीस अवधूत पाटील, मुख्याध्यापक श्री सुनील पवार सर तसेच “आपला पाल्य घडवूया….”या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री पंकज व्यवहारे व माननीय वृषाली व्यवहारे संचालक भगीरथ समुपदेशन केंद्र जळगाव आदी मान्यवर उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्याध्यक्षपदी पवन खंबायत व उपाध्यक्षपदी जनार्दन बाविस्कर या पालकांची निवड करण्यात आली. इतर सर्व समित्यांच्या कार्यकारिणीची निवड नव्याने करण्यात आली. त्यासाठी पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रमुख सौ. पुनम पाटील यांनी सूत्रसंचालन केले व श्रीम.धुमाळ मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. वंदे मातरम या राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

Darpaan Jagat