Advertisement

सिया की सरगम’ मैफल ८ ऑगस्टला जळगावात; बालगायिका सिया भावसार सादर करणार हिंदी-मराठी गाणी…..

जळगाव: जळगावकर संगीतप्रेमींसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ‘गाणयात्री’ म्हणून ओळखली जाणारी बालगायिका सिया भावसार हिच्या सुरील्या आवाजात हिंदी आणि मराठी गाण्यांची बहारदार मैफल ‘सिया की सरगम’ रंगणार आहे.हा विशेष सांगीतिक कार्यक्रम शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता महाबळ येथील मायादेवी नगरमधील ‘रोटरी भवन’ येथे आयोजित करण्यात आला आहे.पुण्यातील स्पर्धांमध्ये मिळवले यश बालगायिका सिया भावसार हिने आपल्या गायकीने पुण्यात विशेष ओळख निर्माण केली आहे. ती पुण्याच्या नामांकित ‘सिंगिंग स्टार’ स्पर्धेची विजेती असून ‘पुणे आयडल लिटिल चॅम्प्स’ची फायनलिस्ट (अंतिम फेरीतील स्पर्धक) देखील राहिली आहे. या मैफलीत जळगावकरांना तिच्या सुरांचा जादूई अनुभव घेता येणार आहे.प्रमुख आयोजक आणि अतिथीया कार्यक्रमाचे आयोजन श्री. व सौ. मालती भास्करराव भावसार (जुनागडे) यांनी केले आहे. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. अपूर्वा वाणी करणार आहेत.या संगीत महोत्सवाला विशेष अतिथी म्हणून माननीय आमदार श्री. राजू (मामा) भोळे, प्रा. श्री. शरदचंद्र छापेकर आणि श्रीमती उज्वला कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब जळगाव, श्री. चिंतामण पाटील, श्री. दुष्यंत जोशी आणि संपदा छापेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.या सुरील्या मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी जळगावातील सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे सादर आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Darpaan Jagat