जळगाव: आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या जळगाव महानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ क्रमांक १ यांच्यातर्फे २१ जून २०२६, रविवारी, छत्रपती शिवाजी नगर येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार जॉगिंग पार्क, जळगाव येथे भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत संपन्न झाला. योग प्रशिक्षक श्रीमती मॅडम व श्री. प्रमोद निकुंभ यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक प्रार्थनेने झाली. त्यानंतर १२ सूर्यनमस्कारांच्या सत्राने सर्व सहभागींना ऊर्जा प्राप्त झाली. त्यानंतर ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, शवासन इ. महत्वाच्या आसनांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन देण्यात आले. अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी प्राणायाम आणि १० मिनिटांच्या मार्गदर्शित ध्यानाने कार्यक्रमाची सांगता झाली. योगाचार्यांनी योगाचे दैनंदिन, जीवनातील महत्व, तणावमुक्ती, आरोग्य संवर्धन आणि आयुर्वेदिक जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केले. तसेच “योग हा केवळ व्यायाम नाही तर एक जीवनशैली आहे.” कार्यक्रमात मंडळातील विविध संस्था, शाळा, महाविद्यालये आणि युवा मंडळांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे मंडळातील नागरिकांमध्ये योग व आरोग्याविषयी जागृती निर्माण झाली असून, असे कार्यक्रम भविष्यातही नियमितपणे घेण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास मंडळातील शेकडो नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक-युवतींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, ह्या वेळेस जळगाव महानगर चे सरचिटणीस विशाल भाऊ त्रिपाठी उपाध्यक्ष राजूभाऊ मराठे मंडळाध्यक्ष आनंद सपकाळे नगरसेवक विजय बांदल विजय जगताप महेश चौधरी संजय शिंदे तुषार सूर्यवंशी दिलीप नाझरकर दीपक सुरळकर अनिल साठे दिनेश पुरोहित पवन राणा जयदीप शहा, तारा ताई पटेल राजश्रीताई सोनवणे दर्शनाताई सपकाळे श्रुती मराठे, तसेच भा.ज.पा जळगाव जिल्हा महानगरचे सर्व प्रदेश, जिल्हा, पदाधिकारी, मा. नगरसेवक, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.












