जळगाव: राज्यात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये तसेच शासकीय आरोग्य योजनांचा लाभ अखंडपणे मिळत राहावा, यासाठी भाजपा जळगाव महानगरच्या वतीने आज जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात विशेषतः ICU, आपत्कालीन सेवा व इतर अत्यावश्यक आरोग्य सेवा अखंड सुरू ठेवण्याची, गंभीर रुग्णांच्या उपचारात कोणताही विलंब होऊ न देण्याची तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत यांसारख्या शासकीय आरोग्य योजनांचा लाभ पात्र रुग्णांना नियमितपणे मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही विनंती करण्यात आली.
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही सर्वोच्च असून, कोणत्याही परिस्थितीत रुग्णसेवा खंडित होऊ नये, हीच भाजपा ची भूमिका आहे.
यावेळी जळगाव शहराचे लाडके आमदार सुरेश दामू भोळे-राजू मामा, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक जी सूर्यवंशी,महापौर सौ. दीपमाला ताई काळे, स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील गटनेते,प्रकाशी जी बालाणी,भाजपा महानगर सरसिटणीस विशाल त्रिपाठी, नगरसेवक निलेश तायडे,दिपक परदेशी, राजेंद्र मराठे,आनंद सपकाळे,सागर पाटील, पितांबर भावसार,राहुल पाटील,भूषण लाडवंजारी, प्रकाश पंडित, मयूर भदाणे,संजय विसपुते,स्वप्नील साकळीकर,मंदाताई सोनवणे, उषा परदेशी,सुमन मराठे,उमेश देशापांडे इ. पदाधिकारी उपस्थित होते.














