Advertisement

देऊळ बंद 2-चित्रपट दमदार कामगिरी करतोय

मुंबई:  ‘देऊळ बंद’ 2 या चित्रपटाचा दुसरा भाग 21 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’नंतर आता प्रवीण तरडे यांचा हा चित्रपट दमदार कामगिरी करतोय.

विशेष म्हणजे पहाटेच्या शोसाठीही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. अनेक थिएटर्समध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल झाल्याचं पहायला मिळत आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरत आहे.देऊळ बंद 2’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 2.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 2.55 कोटी रुपयांची कमाई झाली होती. ‘देऊळ बंद 2’च्या वीकेंडच्या कमाईत दुप्पट वाढ झाल्याचं पहायला मिळालं. पहिल्या शनिवारी कमाईचा आकडा 4.85 कोटी रुपयांवर पोहोचला.देऊळ बंद 2’ या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 9.85 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन आणि 11.62 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचं आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी लेखनशैलीमुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरला आहे. प्रदर्शित होताच मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील यंदाचा सर्वाधिक चर्चेत असलेला आणि संभाव्य ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार असल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात सुरू झाली आहे.
Darpaan Jagat