जळगांव शहराचे विकास पुरुष व आमदार मा.श्री. सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त
जळगाव शहरातील लोकप्रिय आमदार मा.श्री. सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांचा आज वाढदिवस निमित्त राजू मामा यांचा जन्म १३ जून १९६५ रोजी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे झाला. शेतकरी कुटुंबातील ते एक सामान्य माणूस. बी.ए. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कृषी आणि राजकारणात सक्रिय झाले. त्यांची सौभाग्यवती *मा.सौ. सीमा मामी भोळे* या जळगाव शहराच्या माजी महापौर व त्यांना दोन मुले – *विशाल आणि मोहित* आहेत. जनसामान्यांशी जवळीक आणि साधेपणा यामुळे लोक त्यांना प्रेमाने “राजू मामा” म्हणून हाक मारतात.
1. सलग तीन वेळा विजय २०१४ ची निवडणूक ते २०२६ आजपावेतो सलग १२ वर्षे भाजप तिकिटावर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तत्कालीन आमदार सुरेश जैन यांच्याकडून जागा खेचून घेतली.
2. २०१९ ची निवडणूकला दुसऱ्यांदा विजय मोठ्या मताधिक्याने निवड.
3. २०२४ ची निवडणूक तिसऱ्यांदा हॅट्रिक. महायुतीच्या उमेदवार म्हणून १,५१,५३६ मते मिळवून भव्य विजय.
ते सध्या महाराष्ट्र विधानसभेचे सलग तिसऱ्या टर्मचे सदस्य आहेत.
विकासकामे, जनसेवा म्हणूनच राजूमामा यांची ओळख *”जनतेचे सेवक”* या भावनेतून ओळखली जाते. गेल्या १२ वर्षांत जळगाव शहराच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांवर भर, लाडकी बहिण योजना सारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हजारो महिलांच्या अर्जांचे स्वतः पुढाकार घेऊन भरले, पक्षांतर्गत आणि शहरातील विविध समस्या सोडवण्यात सक्रिय भूमिका., शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव उपलब्ध. ते म्हणतात, “गेल्या दहा वर्षात ५०% कामे पूर्ण, २५% पाईपलाइनमध्ये आणि उर्वरित विजयानंतर पूर्ण करू.” हा त्यांचा आत्मविश्वास आणि विकासाची दृष्टी दर्शवतो. लोकप्रियता, संपर्कप्रिय सदैव जनतेत मिसळणारे, समस्या ऐकणारे आणि सोडवणारे. कार्यसम्राट जळगाव शहराचे विकास पुरुष “लाडके” आणि “कार्यसम्राट”, साधे राहणीमान, कर्तव्यदक्षता आणि जनसेवेची भावना म्हणून ओळख यामुळे त्यांना मोठा जनसमर्थन मिळतो.
राजू मामा भोळे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि आणखी मोठ्या यशाची शुभेच्छा! जळगाव शहराचा विकास करण्यासाठी त्यांची अथक मेहनत सदैव चालू राहो, हीच अपेक्षा.
एकच मामा, राजू मामा — जळगावचा हक्काचा माणूस!
सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा
दर्पण जगत वृत्तपत्र समुहाकडुन हार्दिक शुभेच्छा











