साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे हे भारतीय परंपरेत अत्यंत शुभ मानले जाते. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अशातच आज १९ मार्च २०२६ रोजी, बुधवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
आज १९ मार्च २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५७,७५० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,४४,६०० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.














