जळगाव: खानदेशच्या भूमीतून आपल्या अस्सल आणि प्रतिभावान लेखणीने संपूर्ण मराठी साहित्यविश्व समृद्ध करणाऱ्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगरच्या वतीने आज त्यांना भावपूर्ण व विनम्र अभिवादन करण्यात आले. येथील कार्यक्रम प्रसंगी बहिणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण करण्यात आले.
या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) आणि भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बहिणाबाईंच्या साहित्य क्षेत्रातील अफाट योगदानाचा गौरव करण्यात आला.
साहित्यातील मोल अमूल्य:
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “बहिणाबाई चौधरी यांनी खानदेशी बोलीभाषेतून मानवी जीवन, निसर्ग आणि तत्त्वज्ञान ज्या सहजतेने मांडले, ते आजही प्रत्येक पिढीला मार्गदर्शन आणि प्रेरणा देते. जळगावच्या मातीत जन्मलेल्या या महान कवयित्रीचे विचार आणि रचना मराठी संस्कृतीचा अनमोल ठेवा आहेत.”
मान्यवरांची उपस्थिती:
या अभिवादन कार्यक्रमास माजी जिल्हाध्यक्ष सौ. उज्ज्वलाताई बेंडाळे, नगरसेवक वीरेंद्र खडके, विशाल भोळे, विजय बांदल, प्रदीप रोटे, चेतन तिवारी, तसेच मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, अनिल जोशी, हर्षल सिखवाल यांची विशेष उपस्थिती होती.
याशिवाय विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, उदय भालेराव, राजेंद्र मराठे, दीपक परदेशी, सागर पाटील, सचिन बाविस्कर, विजय वानखेडे, प्रकाश पंडित, मयूर भदाणे, उन्मेष चौधरी, संतोष इंगळे, प्रल्हाद सोनवणे, महेश चौधरी, प्रमोद वाणी, चेतना मुळीक, मयूर मुळीक, दिलीप लाडवंजारी, शिवा कळस्कर, लोकेश जोशी, रवी परदेशी, राजश्री शर्मा, राजश्री सोनवणे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.














