Advertisement

“निर्दोष बालकासाठी न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही — आरोपींना फाशी किंवा जन्मठेपच हवी!”

निर्दोष बालकासाठी न्याय — हीच आमची लढाई!” – फारुक शेख

यावल: येथे केवळ ५ वर्ष ७ महिन्यांच्या निष्पाप बालकाच्या अपहरण व निर्घृण हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला होता. दिनांक 05/09/2025 रोजी हरवलेल्या बालकाबाबत यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 364/25, बीएनएस कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 06/09/2025 रोजी त्या बालकाचा मृतदेह त्याच्या घराशेजारील घरात आढळून आला, ज्यामुळे प्रकरणाला अत्यंत गंभीर व अमानुष वळण मिळाले.

या प्रकरणात बीएनएस कलम 103(1), 238 तसेच वैद्यकीय तपासणीनंतर पॉक्सो कायद्यांतर्गत कलम 4, 5 (एल)(एम) व 6 लागू करण्यात आले. मुख्य आरोपी शेख शाहिद बिस्मिल्ला याला अटक करण्यात आली असून पुढील तपासात आरोपी क्रमांक 2 शेख असदुल्ला गुलाम दस्तगीर यालाही अटक करून बीएनएस कलम 49 ची भर घालण्यात आली.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी या प्रकरणात भुसावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यानंतर आरोपी क्रमांक 1 ने जामीन अर्ज सादर केला असता, एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी फिर्यादी यासीन खान यांच्या माध्यमातून प्रसिद्ध वकील अँड फिरोज शेख यांच्या सहाय्याने या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. सरकारी वकील सोनवणे व अँड फिरोज शेख यांनी प्रभावी युक्तिवाद करताच माननीय न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज 16 मार्च 26 रोजी फेटाळला.

दरम्यान, आरोपी क्रमांक 2 असदुल्ला गुलाम दस्तगीर याला 27 नोव्हेंबर 2025 रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणात ठोस विरोध न झाल्याने जामीन मिळाल्याने फिर्यादीकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर फिर्यादी यांनी एकता संघटनेचे फारूक शेख यांच्याकडे धाव घेतली आणि प्रकरणात सक्रिय पाठपुरावा करण्याची विनंती केली.
यानंतर सातत्याने पाठपुरावा करत, 16 मार्च 2026 रोजी पुन्हा एकदा मुख्य आरोपीचा जामीन अर्ज भुसावळ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस टी सुर यांनी ठामपणे फेटाळला आहे.

 

 

 

 

 

 

एकता संघटनेचा इशारा:
या प्रकरणाबाबत एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत स्पष्ट इशारा दिला आहे की —
“जोपर्यंत या निर्दोष बालकाला न्याय मिळत नाही, आणि आरोपींना फाशी किंवा किमान जन्मठेप होत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही!”
“हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.”
“अशा नराधमांना कायद्याचा सर्वात कठोर धडा मिळालाच पाहिजे, अन्यथा समाजात भीती आणि असुरक्षितता वाढेल.”

समाजाला आवाहन:
एकता संघटनेने सर्व समाजबांधवांना आवाहन केले आहे की, या प्रकरणात पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे आणि न्यायासाठी एकजूट दाखवावी.

Darpaan Jagat