Advertisement

खाजा नगर नागरिकांच्या “२००२” मतदार यादीतील न्यायासाठी लढा रंगला – प्रशासनाने घेतली तातडीची दखल!

जळगाव: दि.२८ प्रतिनिधी – सन 2002 च्या मतदार यादीतून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या न्यायासाठी अखेर प्रशासन हलले असून, संबंधित प्रकरणात ठोस कारवाईची चिन्हे दिसू लागली आहेत.
खाजा नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरणात अनेक नागरिकांची नावे 2002 च्या मतदार यादीतून वगळली गेली होती. या गंभीर अन्यायाविरोधात नागरिकांनी निवडणूक प्रशासनाकडे निवेदन सादर करत न्यायाची मागणी केली होती.

निवेदन समर्पित
सदर निवेदन निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे यांना जैनुद्दीन शेख सलीम यांच्या हस्ते देण्यात आले त्या वेळी खाजा नगरीचे नदीम शेख ,हारून खान , मुबिन भिस्ती,अफजल खान व एकताचे फारुख शेख हजर होते.
या वेळी श्रीमती मोरे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत त्वरित कारवाई करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे.

या प्रकरणात १९९४, १९९६ आणि २००४ च्या मतदार याद्यांतील पुरावे तसेच पुनर्वसन कागदपत्रे सादर करण्यात आली असून, यावरून संबंधित नागरिकांची नावे केवळ प्रशासकीय त्रुटीमुळे वगळली गेल्याचे स्पष्ट होत आहे.

एकता संघटना व स्थानिक नागरिकां तर्फे इशारा
जर सदर प्रकरणी लवकरात लवकर योग्य निर्णय झाला नाही, तर मोठे जनआंदोलन उभे केले जाईल.
प्रशासन सकारात्मक
प्रशासनाने संपूर्ण कागदपत्रे, ठराव,निवडणुकीच्या याद्या बघून सकारात्मक भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.
“न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, पण प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण होणे गरजेचे आहे!” अशी आशा फारुक शेख यांनी व्यक्त केली.

Darpaan Jagat