Advertisement

अनोखा आणि प्रेरणादायी सामूहिक विवाह सोहळा;* * *मनीयार बिरादरीने दिला समाज एकतेचा व साधेपणाचा संदेश”

जळगाव : आजच्या वाढत्या खर्चिक विवाह पद्धतीच्या काळात समाजाला नवी दिशा देणारा आणि साधेपणा, एकता तसेच इस्लामी मूल्यांचा सुंदर संदेश देणारा शिसगर मुस्लिम समाज फाउंडेशन, सुप्रीम कॉलनी जळगाव आयोजित चौथा सामूहिक विवाह सोहळा 24 मे 2026 रोजी मन्यार हॉल येथे अत्यंत उत्साहपूर्ण व धार्मिक वातावरणात संपन्न झाला.
या सामूहिक विवाह सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे चार विवाहांमध्ये दोन  मनीयार  बिरादरी, एक शिकलगर बिरादरी आणि एक पटेल बिरादरीच्या वधू-वरांचा समावेश होता. विशेष म्हणजे, एक विवाह हा दोघे वेगवेगळ्या बिरादरीतील असूनही इस्लामी शरियतच्या मार्गदर्शनानुसार पार पाडण्यात आला. यामुळे समाजात बिरादरीपेक्षा इस्लामी बंधुभाव आणि मानवी एकतेलाच अधिक महत्त्व दिले पाहिजे, असा सकारात्मक संदेश या विवाह सोहळ्यातून देण्यात आला.
सामूहिक विवाह सोहळ्यात बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या काळात अनावश्यक खर्च, दिखावा आणि हुंड्याच्या प्रथेमुळे अनेक गरीब कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण येतो. त्यामुळे प्रत्येक गाव, खेडे आणि तालुक्यात अशा प्रकारचे सामूहिक विवाह आयोजित होणे काळाची गरज आहे. तसेच साखरपुड्याच्याच कार्यक्रमात विवाह सोहळा पार पाडण्याची समाजाने सकारात्मक परंपरा सुरू करावी.”
यावेळी त्यांनी येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर समाजाला कायद्याचे पालन करण्याचे आवाहनही केले. महाराष्ट्र शासनाने गौवंश कुर्बानीवर बंदी घातलेली असल्याने कोणत्याही परिस्थितीत गौवंशाची कुर्बानी करू नये, कायद्याचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वधू-वरांची नावे पुढीलप्रमाणे :
१) सना शेख गफार शेख, जळगाव — अन्सार बेग दिलावर बेग, भुसावळ
२) मुस्कान रहीम मनियार, धुळे — शेख  शादाब , मुक्ताईनगर
३) सानिया बी सलीम खान शिकलगार, एरंडोल — शब्बीर खान आसिफ खान, जळगाव
४) फरीन नाझ, मासुम वाडी — समीर सलीम पटेल, सुप्रीम कॉलनी जळगाव
सदर विवाह सोहळ्याचे खुत्बा-ए-निकाह भुसावळ येथील मौलाना अलीम रजा आणि मौलाना मोहम्मद यांनी सादर केले.
कार्यक्रमाला बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, सचिव अजिज सर, उपाध्यक्ष हकीम चौधरी, जमील सौदागर, सुप्रीमचे शेख मेहमूद चाचा, असलम सर, कोषाध्यक्ष, सहसचिव  रऊफ टेलर, साबीर मेंबर ,सलीम शेठ, हाफिज करीम, हाजी आरिफ, कलीम मेंबर , नसीब मुन्नाभाई, इब्राहिम पटेल, साहिल पटेल, मुक्ताईनगरचे नगरसेवक सुरेश भाऊ भापसे, रवी भाऊ सोनवणे, बाळादादा सोनवणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शेख तनवीर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष डॉ. फिरोज शेख यांनी मानले.
हा सामूहिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ. फिरोज शेख यांच्या नेतृत्वाखाली फारुख शेख, आसिफ शेख, अखिल शेख, शेख अजीज, नूर मोहम्मद, सय्यद रईस, अकील खान, शेख अफजल, अब्दुल रब, तन्वीर, रहमत, मुर्तुजा शेख, शेख फिरोज आणि अब्दुल रहमान यांनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमातून समाजात साधेपणा, बंधुभाव, धार्मिक मूल्यांचे पालन आणि सामाजिक ऐक्य यांचा अत्यंत सकारात्मक संदेश देण्यात आला. आजच्या काळात अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज असून, हा विवाह सोहळा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
Darpaan Jagat