Advertisement

फारुक शेख यांना “पंडित जवाहरलाल नेहरू समाज भूषण पुरस्कार 2026” ने सन्मानित

 

जळगाव – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जळगाव येथील फारुक शेख यांना “पंडित जवाहरलाल नेहरू समाज भूषण पुरस्कार 2026” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुबा नाज हेल्प मल्टिपर्पज सोसायटी, यावल यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात उपजिल्हाधिकारी मनोज देशमुख यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.
फारुक शेख हे जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष तसेच एकता संघटनेचे समन्वयक म्हणून कार्यरत असून त्यांनी समाजातील विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करत समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना फारुक शेख यांनी अत्यंत नम्रपणे सांगितले की,
“हा सन्मान माझा एकट्याचा नसून मणियार बिरादरी आणि एकता संघटनेच्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच हे कार्य शक्य झाले.”
तसेच त्यांनी हा पुरस्कार आपल्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये गट शिक्षण अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी सतीश बाविस्कर तसेच इतर अधिकारी आणि समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सन्मान केवळ फारुक शेख यांच्या कार्याची दखल नसून, समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Darpaan Jagat