जळगाव: ईदच्या पवित्र दिवशी जिथे आनंद आणि बंधुभावाचे वातावरण होते, त्याच ठिकाणी जळगाव जिल्हा एकता संघटनेने “आम्हास न्याय रुपी ईदी द्या” अशी ठाम आणि आक्रमक मागणी करत पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले.
ईदच्या निमित्ताने ईदगाह मैदानावर मुस्लिम समाजाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गंगावणे यांचे एकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाल देऊन स्वागत केले.
यानंतर, शुभेच्छा स्वीकारताच संघटनेने थेट प्रशासनासमोर “न्यायाची ईदी” मागत गंभीर प्रकरणांवर कारवाईची जोरदार मागणी केली.
गंभीर प्रकरणांवर संताप व्यक्त
संघटनेने निदर्शनास आणून दिले की:
तांबापुर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात (गुन्हा क्र. 102/26)
पीडितेने न्यायालया समक्ष मुख्य आरोपीला साथ देऊन तिच्यावर अत्याचार प्रकरणी जबाबदार असलेल्या ४ लोकांची नावे जबाबात स्पष्ट सांगूनही
अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
तसेच गुन्हा क्र. 161/26 व 163/26 मध्ये मास्टर कॉलनी मधील कुरेशी मोहल्ला येथे रात्री कार व दोन मोटर सायकली ने आलेले ८ ते १० गोरक्षक यांच्या वर अद्याप पावे तो कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा नोंदवता
केवळ मुस्लिम तरुणांवरच दोन गुन्हे नोंदवून कठोर कारवाई केली आजही ते अल्प संख्यांक तरुण इच्छा दिवशी सुद्धा कारागृहामध्ये आहे.
तर दुसऱ्या बाजूच्या संबंधित सर्व व्यक्तींना पूर्णपणे मोकळे सोडण्यात आले आहे
यामुळे पोलिसांच्या कारवाईवर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप करण्यात आला
ईदगाह मैदानावरच निवेदन सादर
एकता संघटनेने सदर सर्व बाबींचे सविस्तर निवेदन थेट
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना ईदगाह मैदानावरच सादर केले
यावेळी डॉ. रेड्डी यांनी तत्काळ दखल घेत उपस्थित पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे सदर निवेदन सुपूर्द करत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले
“न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन” — एकता संघटना
एकता संघटने चे फारुक शेख यांनी स्पष्ट इशारा दिला की:
जर सर्व आरोपींवर समान व निष्पक्ष कारवाई झाली नाही, तर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, तसेच उच्च न्यायालय व मानवाधिकार आयोगाचा दरवाजा ठोठावला जाईल.
एकता संघटनेची ठाम भूमिका
“ईद फक्त आनंदाची नाही, तर न्यायाचीही असते…
जर पीडितेला न्याय मिळत नसेल, तर ती ईद अपूर्ण आहे!”
असा जोरदार संदेश एकता संघटने चे फारुक शेख यांनी यावेळी दिला.
साकडे मध्ये यांचा होता समावेश
फारुक शेख, आरिफ देशमुख, ताहेर शेख, अनिस शहा, नजमुद्दीन शेख, समीर शेख,
वसीम रियाज, तौसीफ शेख, अरबाज शेख, वसीम चांद अरबाज खान, यांचा समावेश होता














