जळगाव – ज सू खडके प्राथमिक विद्या मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की… या भजनाने करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समिती कार्याध्यक्ष पवन खंबायत माजी अध्यक्ष गणेश काळे संस्थेचे चिटणीस अवधूत जी पाटील व स्वाती व सुनील चौधरी ,स्नेहा खंबायत यांच्या हस्ते बाळकृष्णाच्या फोटोचे प्रतिमापूजन व श्रीकृष्ण आरती करण्यात आली कार्यक्रम प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुनील पवार सर यांनी केले श्रीमती धुमाळ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या दहीहंडी का फोडली जाते याविषयी , बाललीला भजन व गोष्ट सांगितली तर सौ चौधरी मॅडम यांनी कोण कहते हे भगवान आते नही.. हे विद्यार्थ्यांकडून भजन म्हणून घेतले तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी फेर धरून गरबा दांडिया नृत्य सादर केले तरी व विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली यावेळी माता पालकांनी देखील दांडियाचा नृत्य आनंद लुटला यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन श्रीमती तिलोत्तमा तायडे मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.















