Advertisement

सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाची लहरी स्थिती, खंड पडणे आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्या.

पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने पीक पेरणीचे काटेकोर नियोजन करावे. कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची लागवड करावी,  पाण्याचे योग्य नियोजन व नोंदणीकृत बियाणे घेऊनच पेरणी करावी, शक्य असल्यास कमी क्षेत्रात लागवड करता येणार काय, याचेही नियोजन करावे.
१० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.
याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.एल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून काटेकोर नियोजन करूनच खरीप हंगामाला सुरुवात करणे सोयीचे राहील.
शेतकऱ्यांनी घाई गडबड करू नये. मुख्य पिकांची पेरणी पुरेशा प्रमाणात (किमान ७५ ते १०० मिलिमीटर) पाऊस झाल्याशिवाय करू नये.
कमी कालावधीच्या पिकांची लागवड करणे सोयीचे ठरेल. कृषी अधिकारी व सहायकांचे मार्गदर्शन घ्या
खरीप हंगामावर एल निनोचे सावट पाहता आणि हवामानाच्या अंदाज व कृषी विषयक मार्गदर्शनासाठी गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन शेतकरी बांधवांनी घ्यावे, असेही कृषी विभागाने आवर्जून सांगितले आहे.
Darpaan Jagat