Advertisement

जळगावात आषाढी एकादशीनिमित्त गोलाणी मार्केट परिवाराकडून केळी आणि राजगिरा लाडूंचे वाटप!

जळगाव (प्रतिनिधी):आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचा उत्साह पाहायला मिळत आहे. याच भक्तीमय वातावरणाचे औचित्य साधून जळगाव शहरातील प्रसिद्ध गोलाणी मार्केट परिवाराच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ‘बनाना सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात या निमित्ताने भाविक आणि नागरिकांना केळी आणि उपवासाचे राजगिरा लाडू यांचे मोफत वाटप करण्यात आले.आषाढी एकादशीला उपवास करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. हीच बाब लक्षात घेऊन गोलाणी मार्केटमधील व्यापारी आणि सदस्यांनी एकत्र येत या अनोख्या वाटपाचे आयोजन केले होते. जळगावची वैशिष्ट्य असलेली दर्जेदार केळी आणि पौष्टिक राजगिरा लाडूंचा प्रसाद मिळताच नागरिकांनी गोलाणी मार्केट परिवाराच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.या उपक्रमामुळे बाजारपेठेत भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गोलाणी मार्केट परिवारातील सर्व प्रमुख व्यापारी, कार्यकर्ते आणि सदस्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि यशस्वीरित्या पार पडला.

प्रतिक्रिया:”आषाढी एकादशीला विठ्ठल चरणी सेवा म्हणून आम्ही दरवर्षी काहीतरी वेगळा उपक्रम करण्याचा प्रयत्न करतो. यंदा आमच्या जळगाव बनाना सिटीची ओळख असणारी केळी आणि उपवासासाठी राजगिरा लाडूंचे वाटप करून नागरिकांची सेवा करता आली, याचा आम्हा सर्व गोलाणी मार्केट परिवाराला मोठा आनंद आहे.”— गोलाणी मार्केट परिवार, जळगाव.
Darpaan Jagat