जळगाव : महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी गरबा व दांडिया कार्यक्रमांमध्ये मुसलमानांना प्रवेश न देण्याच्या भूमिकेचे खुले समर्थन केले आहे. गरब्यात येणाऱ्या लोकांची ओळख तपासावी आणि प्रवेशापूर्वी हनुमान चालीसा पढवावी, असे वक्तव्य त्यांनी पीटीआय ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. तसेच जो व्यक्ती मूर्तीपूजा करत नाही, त्याने हिंदू धार्मिक कार्यक्रमात शिरकाव करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
एकता संघटना, जळगाव या वक्तव्याचा कडक निषेध करते. हिंदुस्तानच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला बराबरीचा हक, आणि आपल्या धर्मावर अमल करण्याची आझादी दिली आहे. कोणत्याही नागरिकाला त्याच्या धर्मा च्या आधारावर वेगळे करणे किंवा त्याची धार्मिक आस्था सिद्ध करण्याची अट घालणे हे संविधानातील समानता आणि भाईचाऱ्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे.
या प्रकरणी एकता संघटने तर्फे फारुक शेख यांनी संबंधित व्हिडिओ क्लिप, पी टी आय संदर्भ, वृत्तपत्रांच्या प्रती आणि डिजिटल पुराव्यांसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, बी एन एस कलम 196 तसेच तपासात लागू होणाऱ्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार एफ आय आर दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
एकता संघटने चे फारुक शेख व हाफिज रहीम यांनी प्रेस नोट द्वारा स्पष्ट केले की आमचा संघर्ष कोणत्याही धर्माविरुद्ध नसून संविधान, कायद्याचे राज्य, समान नागरिकत्व आणि हिंदुस्तानच्या सामाजिक भाईचाऱ्याच्या संरक्षणासाठी आहे.
जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार सादर
एकता संघटने शिष्टमंडळ जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे जाऊन फारुक शेख यांनी लेखी तक्रार अर्ज सादर करून सदर बाबत एफ आय आर नोंदवून झिरो क्रमांकाने ती ट्रान्सफर करावी अशी विनंती केली ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री सोनवणे यांनी ती स्वीकारली व आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
*एकता संघटनेचे खालील पदाधिकारी हजर होते*
हाफिज रहीम पटेल, फारुख शेख, अनिस शहा, साहिल शेख, सईद शेख, जावेद शेख ,शेख अमिन, महमूद रंगरेज, गुफरान मौलाना, मौलाना रियाज काकर, रिजवान शेख आदी उपस्थित होते.














