Advertisement

पालक व शाळा यांना जोडणारा उपक्रम…एक दिवस शाळेसाठी…

 

जळगाव: 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त लोक शिक्षण मंडळ जळगाव संचलित स्वा.सै.जनार्दन सुका खडके प्राथमिक विद्यामंदिरामध्ये ‘एक दिवस शाळेसाठी..’ हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त एकूण 16 पालक बंधू भगिनींना शिक्षकांची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच मुख्याध्यापक पदाची जबाबदारी विद्या मंदिराच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ स्वाती सुनील चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली होती.या अंतर्गत एका दिवसाचे संपूर्ण वर्गाचे कामकाज पालक बंधू भगिनींनी शिक्षक बनून समर्थपणे पार पाडले. तसेच सदर प्रसंगी अध्यक्ष म्हणून लोक शिक्षण मंडळाचे चिटणीस मा.श्री. अवधूत पाटील सर तसेच मुख्याध्यापक मा. श्री.सुनील पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर प्रसंगी विद्या मंदिरातील सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच पालक शिक्षक बंधू भगिनींचा सत्कार करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या प्राध्यापिका माननीय डॉ.सौ सुनिता नेमाडे मॅडम यांची देखील उपस्थिती लाभली .त्यांच्या समर्पक मार्गदर्शनातून शिक्षक दिन अधिकच विस्तृत झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्या मंदिरातील शाळा व्यवस्थापन समिती अंतर्गत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूनम पाटील यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला .

Darpaan Jagat